Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रऑनलाईन शिक्षणाचा बाजार!, परवानगी नसताना थाटली जात आहेत दुकाने

ऑनलाईन शिक्षणाचा बाजार!, परवानगी नसताना थाटली जात आहेत दुकाने

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कोरोनामुळं ऑनलाईन शिक्षणाचा जोर वाढला. याचा गैरफायदा घेणारेही तयार आहेत. उच्च शिक्षण संस्थांना फ्रँचाईसीच्या माध्यमातून दूरस्थ शिक्षण देण्याची सुविधा नाही. हे विद्यापीठ अनुदान आयोगानेही स्पष्ट केले आहे. तरीही काही शहरात फ्रँचाईसींचा सुळसुळाट दिसतो. नागपुरात काही खासगी कंपन्या व अॅपच्या माध्यमातून विद्यापीठांची नावे सुरू करून विद्यार्थ्यांनी स्वप्न दाखविली जातात. या विद्यापीठाची पदवी मिळेल, असा दावा केला जातो. यातून काही विद्यार्थी काही फ्रँचाईसींच्या जाळ्यात अडकतात. फ्रँचाईसीकडून एजंटदेखील नेमण्यात आले आहेत. ऑनलाईन प्रचारावर भर दिला जातो.

फ्रँचाईसीच्या नावाखाली दुकानदारी
विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या अॅप्सची नागपुरात काही कार्यालये आहेत. इतवारी, सक्करदरा, नंदनवन, धरमपेठ आदी ठिकाणी दुकाने थाटण्यात आली आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क केला जातो. विविध कोचिंग क्लासेस टायअप करण्याचा प्रयत्न केला जातो. कोरोनामुळं शिक्षण प्रत्यक्ष घेणे शक्य नाही. त्यामुळं कमी खर्चात ऑनलाईन शिक्षणाची आमिष दाखविली जातात. अशावेळी संबंधित शिक्षणाची परवानगी आहे की, नाही याची जाणीव नसते. अशावेळी फसगत होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेताना सावध राहिले पाहिजे.

चौकशी करूनच प्रवेश घ्यावा
लर्नर सपोर्ट सेंटरच्या नावाखाली कंपन्या विद्यार्थ्यांशी संपर्क करतात. उच्च शिक्षण संस्थांना अशी केंद्रे उघडण्याची परवानगी आहे. परंतु, एखाद्या फ्रँचाईसीच्या माध्यमातून एलएससी स्थापन करता येत नसल्याची माहिती आहे. त्यामुळं ऑनलाईन शिक्षण घेत असाल, तर योग्य चौकशी करून अन्यथा तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेला काही महत्त्व राहणार नाही. ऑनलाईन शिक्षणासाठी कमी शुल्क असल्याचे दाखविले जाते. बाहेर पडता येत नसल्याने विद्यार्थी ऑनलाईनला महत्त्व देतात. पण, यात आपली फसगत होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -