ताजी बातमी ऑनलाइन टीम
इचलकरंजी : येथील सेवासदन निरामय रुग्णालयात एका अत्यवस्थ वृद्धेला मृत घोषित केले. तिच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरु झाली.
याचवेळी तिच्या शरीराची हालचाल होत असल्याचे दिसले. हे पाहून नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. गोंधळ वाढून तणाव निर्माण होत असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. परंतु याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
यशोदा दत्तात्रय सुतार (वय ८१, रा. खोतवाडी ता. हातकणंगले) असे त्या वृद्धेचे नाव आहे. या वृद्ध महिलेवर याच सेवासदन निरामय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यशोदा या तोल जाऊन घरात पडल्याने त्यांना शनिवारी उपचारासाठी इचलकरंजीतील सेवासदन निरामय प्रा ली या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्यांना रुग्णालय प्रशासनाने मृत घोषित केले. तेथून नातेवाईकांनी यशोदा यांना घरी नेले.
अंत्यसंस्काराच्या तयारीवेळी जाणवली हालचाल
अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच यशोदा यांच्या शरीराची हालचाल होत असल्याचे दिसले. म्हणून नातेवाईकांनी एका खासगी डॉक्टरांकडून तपासणी केली. त्यात त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे चिडून नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रात्री उशिरापर्यंत त्या वृद्धेवर त्याच रुग्णालयातच उपचार सुरू होते. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही.
इचलकरंजी ब्रेकिंग : रुग्णालय प्रशासनाने घोषित केले मृत अंत्यसंस्काराची झाली तयारी ; आन ती वृद्ध झाली जिवंत
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -