Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशाळांबाबत मोठी बातमी! सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु होणार? शिक्षण मंत्र्यांचा नेमका काय...

शाळांबाबत मोठी बातमी! सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु होणार? शिक्षण मंत्र्यांचा नेमका काय प्रस्ताव? ( Video) पहा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

येत्या सोमवारपासून शाळा सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होतेय. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणं, शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करणं, या गोष्टीवरही भर देण्याचा प्रयत्न प्रस्तावातून देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

https://youtu.be/a_wBQJhX6zw
शाळाबाबत मोठी बातमी ! सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार ..taji Batmi News
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -