Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाअखेर जानेमनची विकेट काढून बुमराहने 925 दिवसांची प्रतिक्षा संपवली

अखेर जानेमनची विकेट काढून बुमराहने 925 दिवसांची प्रतिक्षा संपवली

ताजी बातमी ऑनलाइन टीम

पार्ल: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पार्लच्या बोलँड पार्क (Boland park) मैदानावर पहिला सामना सुरु आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरहाने (Jasprit bumrah) संघाला एकदम परफेक्ट सुरुवात करुन दिली. त्याने तिसऱ्याच षटकात जानेमन मलानला तंबूत पाठवलं. टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराह त्याचे दुसरे षटक टाकत असताना मलानला यष्टीपाठी ऋषभ पंतकरवी झेलबाद केले.


बुमराहसाठी खूप महत्त्वपूर्ण विकेट
जानेमन मलानचा विकेट बुमराहसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण त्याने वनडेच्या पावरप्लेमध्ये तब्बल दोन वर्ष सात महिने म्हणजे 925 दिवसानंतर पहिली विकेट घेतली. यापूर्वी बुमराहने पहिल्या सहा षटकात शेवटची विकेट 2019 वर्ल्कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये घेतली होती. त्याने मार्टिन गुप्तीलला स्लीपमध्ये झेलबाद केले होते.

पावर प्लेमध्ये 233 चेंडू टाकले

त्यानंतर जानेमन मलानची विकेट घेण्याआधी बुमराहने पावर प्लेमध्ये 233 चेंडू टाकले 170 धावा दिल्या. या दरम्यान 28 वर्षाचा बुमराह मँचेस्टर आणि पार्लमध्ये एकूण नऊ वनडे सामने खेळला. त्यामध्ये त्याने सहा विकेट काढल्या. मलान हा बुमराहचा वनडेमधला 109 वा विकेट होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -