ताजी बातमी /ऑनलाईन टीम
राज्य सरकारने महापुरातील नुकसानग्रस्तांना १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत केव्हा मिळणार कशी मिळणार याचबरोबर विविध गोष्टींची चर्चा पूरग्रस्त मध्ये सुरू आहे. तर ही मदत आज शुक्रवार पासूनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकताच दिली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्या शुक्रवारपासून ही १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी (दि. २९) नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
पूरग्रस्तांना तातडीने जाहीर केलेली दहा हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात.
त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. उद्यापासूनच म्हणजेच शुक्रवार ३० जुलैपासून १० हजारांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.