Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात शाळा मंगळवारपासून सुरू; कॉलेजबाबत दोन दिवसांत निर्णय

कोल्हापूर जिल्ह्यात शाळा मंगळवारपासून सुरू; कॉलेजबाबत दोन दिवसांत निर्णय

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या सुमारे चार हजार शाळा मंगळवार, दि. 25 पासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी ऑनलाईन बैठकीत मान्यता दिली. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप शासनस्तरावरून निर्णय झालेला नाही.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर 4 ऑक्टोबर रोजी शाळा, महाविद्यालये सुरू झाली होती. कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवार, दि. 10 पासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 15 फेब—ुवारीपर्यंत बंद ठेवली होती. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र, शाळा सुरू करण्याची शिक्षक व पालकांकडून मागणी होत होती. अनेक शिक्षक संघटनांनी शाळा बंदला विरोध दर्शविला होता. जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक अशा मिळून 2,648 शाळा असून 2 लाख 98 हजार 11 विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात माध्यमिकच्या 1068 शाळा असून 3 लाख 50 हजारपान 4 वर विद्यार्थी घेतात. महापालिकेच्या 58 शाळा असून 10 हजार 200 विद्यार्थी आहेत.

दरम्यान, शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका प्रशासक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेतली. यात शाळा सुरू करण्याबाबतच्या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांनी 25 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तत्पूर्वी, शाळा सुरू करताना शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात यावी, कोरोना रुग्ण जास्त असेल त्याठिकाणी शाळा सुरू करताना विद्यार्थी सुरक्षेचा विचार करावा, कमी पटाच्या शाळा शंभर टक्के सुरू करता येतील, जास्त पटसंख्या असलेल्या शाळा शिफ्टमध्ये चालवाव्यात, शाळा सुरू करताना शाळा स्वच्छता, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, अशा सूचना बैठक दिल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -