Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनफक्त Priyanka Chopraच नाही तर बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यमातून झालेत आई-बाबा!

फक्त Priyanka Chopraच नाही तर बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यमातून झालेत आई-बाबा!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत. काही सेलिब्रिटी असे आहेत जे लग्नानंतर सरोगसीद्वारे आई-बाबा झालेत. तर काही सेलिब्रिटी लग्न न करताच सरोगसीद्वारे आई-बाबा झाले आहेत. या यादीमध्ये आता देसी गर्ल प्रियंका चोप्राचेही नाव सहभागी झाले आहे. शनिवारी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली. आज आपण सरोगसीद्वारे आतापर्यंत कोणते बॉलिवूड सेलिब्रिटी आई-बाबा झाले आहेत ते जाणून घेणार आहोत…

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव हिने मुलाला जन्म देण्यासाठी सरोगसीचा पर्याय निवडला होता. आमिर आणि किरण यांनी 5 डिसेंबर 2011 रोजी सरोगसीद्वारे जन्मलेल्या मुलाचे नाव आझाद ठेवले आहे.

बॉलीवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला. त्यांना आधीच दोन मुलं आहेत. बॉलीवूडमध्ये सरोगसीचा अवलंब करणारे ते पहिले कपल होते. त्यांनी सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या मुलाचे नाव अब्राहम ठेवले आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर देखील सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचा बाप झाला आहे. करण जोहरला एक मुलगा आणि एक मुलगी असून त्याने या मुलांची नावं यश आणि रुही अशी ठेवली आहेत. करणने मुलाचे नाव वडील यश जोहर आणि मुलीचे नाव आई हिरू जोहर यांच्या नावावर ठेवले आहे.

सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा यांनीही सरोगसीद्वारे दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. पहिल्या मुलाच्या जन्माच्या 10 वर्षानंतर जेव्हा दुसऱ्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यात अडचण आली तेव्हा सोहेल खान आणि सीमा खान यांनी सरोगेट मदरचा अवलंब केला.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आज तीन मुलांची आई आहे. सनीने पहिल्यांदा 2017 मध्ये निशा कौर नावाची मुलगी दत्तक घेतली आणि त्यानंतर 2018 मध्ये तिने सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना अशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबरला जन्म दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -