मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलिस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघा वर सवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे.
टाकाळा परिसरात राहणाऱ्या केदार रानडे यांचे केदार कन्सल्टन्सी या नावाचे ताराबाई पार्क परिसरात कार्यालय आहे. रानडे याने वृत्तपत्रात जाहिरात देऊन मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत लोकांना बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे
आवाहन केले होते. २०१७ मध्ये फसव्या जाहिरातीला भुलून याचं परिसरात राहणाऱ्या सुहास नागन्नावार यांनी रानडे याच्याकडे बिटकॉइनच्या माध्यमातून गुंतवणूक करायला सुरुवात केली. जुलै २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या दरम्यान नागन्नावार यांनी जवळपास २० लाख इतक्या रकमेची बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती.
मात्र, ३ वर्षात कोणत्याही प्रकारचा परतावा न मिळाल्याने नागन्नावर यांनी केदार रानडे यांच्यासह दोघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान के दार रानडे या संशयिताला यापूर्वी शाहपुरी पोलिसानी फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतले होते.
आता पुन्हा केदार रानडे आणि अन्य दोघा विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने रानडे याच्या कारनाम्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून पोलिस त्याचे गोव्यातील साथीदार अजय दौडमनी, सुकांता भौतिक या दोघांचा शोध घेत आहेत.
कोल्हापूर ; बिटकॉइन मध्ये गुंतवणूक वीस लाखाची फसवणूक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -