ताजी बातमी ऑनलाइन टीम
जिल्ह्यात रविवारी 723 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात 422 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोल्हापूर शहरातील 311 जणांना कोरोनाची बाधा पोहोचली आहे. सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 536 झाली असून 270 गंभीर रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
मृतांत शहरातील नागाळा पार्क येथील 74 वर्षीय आणि इचलकरंजी येथील 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. आजरा 11, भुदरगड 7, चंदगड 3, गडहिंग्लज 15, गगनबावडा 1, हातकणंगले 53, कागल 19, करवीर 83, पन्हाळा 22, राधानगरी 18, शाहूवाडी 34, शिरोळ तालुक्यात 41 बाधित रुग्ण सापडले. नगरपालिका कार्यक्षेत्रात इचलकरंजी 30, जयसिंगपूर 22, गडहिंग्लज 7, कागल 3, हुपरी, मलकापूर 1, पेठवडगाव येथी 12 जणांना कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. मुंबई, जळगाव, सिंधुदुर्ग, कर्नाटक येथील प्रत्येकी 2, अहमदनगर, धुळे, ओडिशा येथील प्रत्येकी 1, पुणे 6, सांगली 8, सातारा येथील 4 जणांना लागण झाली आहे.
शासकीय प्रयोगशाळेत 2 हजार 211 नमुने तपासले. यात 422 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. 24 जणांचे नमुने फेर तपासणीसाठी आले होते, तर 5 जणांचे नमुने काही तांत्रिक कारणामुळे रिजेक्ट झाले. खासगी प्रयोगशाळेत 782 नमुने तपासण्यात आले. यामध्ये 301 जण पॉझिटिव्ह आले. यातही 22 जणांचे नमुने फेरतपासणीसाठी आले होते. शासकीयसह खासगी रुग्णालयांत 292 जणांची तपासणी झाली.
कोल्हापूर : जिल्ह्यात आणखी 723 कोरोनाबाधित
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -