देशांतर्गत शेअर बाजाराला कमकुवत सुरुवात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 661 अंकांनी अथवा 1.12 टक्क्यांनी घसरून 58,375.76 अंकावर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी 210 अंकांनी घसरून 17,407अंकावर आला. आयटी, मेटल, ऑटो, फार्मा आणि रिअल्टीसह सर्व क्षेत्राचा रोख विक्रीकडे असल्याने बाजारपेठेत दबाव निर्माण झाला. बाजारातील तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. गुंतवणुकदारांना 5.28 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. वर्षाच्या सुरुवातीला दणकेबाज सुरुवातीनंतर बाजाराला उतरती कळा लागली. आज सरर्वच शेअर निर्देशांक निगेटिव्ह दिशेने धावत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदार काळजीत पडले आहे.सध्या सर्वात मोठी घसरण आयटी, मेटल, रिअल्टी आणि ऑटो निर्देशांकांमध्ये आहे. या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची स्पष्ट तूट दिसून आली.
बजाज फायनान्सने सुरुवातीलाच सर्वाधिक 3.75 टक्के घट नोंदविली. याशिवाय विप्रो, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, इन्फोसिस, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपटी दिसून आली. दुसरीकडे सन फार्मा, भारती एअरटेल, इन्डसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी या शेअर्समध्ये या गडबडीत ही तेजीचा आलेख चढता ठेवला.