Sunday, December 22, 2024
Homeबिजनेसफेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार

फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार

या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात बँका १२ दिवस बंद राहतील. याअगोदर जानेवारी महिन्यात १६ दिवस सुट्या होत्या. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचाही समावेश होतो.

फेब्रुवारी महिन्यात बसंत पंचमी आणि गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. देशभरातील सर्व बँका संपूर्ण महिन्यात १२ दिवस बंद राहणार नाहीत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. फेब्रुवारी महिन्यात येणार्‍या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात.

त्यामुळे बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेला प्रत्यक्ष भेट देण्याचा विचार करत असाल तर सुट्टीची यादी पाहिल्यानंतरच विचार करा. जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात प्रजासत्ताक दिनी बँका बंद राहतील.

ही आहे सुट्ट्यांची यादी
२ फेब्रुवारी – सोनम लोचर (गंगटोकमध्ये बँका बंद)
५ फेब्रुवारी – सरस्वती पूजा/श्री पंचमी/बसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
६ फेब्रुवारी – रविवार
१२ फेब्रुवारी – महिन्याचा दुसरा शनिवार
१३ फेब्रुवारी – रविवार
१५ फेब्रुवारी – मोहम्मद हजरत अली जन्मदिन /लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनौमध्ये बँका बंद)
१६ फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
१९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्रामध्ये बँका बंद)
२० फेब्रुवारी – रविवार
२६ फेब्रुवारी – महिन्याचा चौथा शनिवार
२७ फेब्रुवारी – रविवार

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -