ताजी बातमी ऑनलाईन टीम
रेंदाळ येथे माहेरी असलेल्या व उदरनिर्वाहासाठी चिकन बिर्याणीचा गाडा चालवणाऱ्या पत्नीला दिवसभर फोन केला असता बोलत नाही म्हणून वैफल्यग्रस्त पतीने पत्नीवर सत्तूरने सपासप वार करून खून केला. समिना इम्तियाज नदाफ (वय २७) असे मृत नाव असून आरोपीचे नाव इम्तियाज
राजू नदाफ (वय ३३ रा.कोरोची) असे आहे.
आरोपी इतका बेभान झाला होता की सपासप १७ वार करून
मुंडके तोडले तर मेना अडवण्यासाठी गेलेल्या मुलीचा बाप सलिम नदाफ यांच्या हातावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले आहे. तर जमावाने आरोपीला बेदम मारहाण केली आहे.
ही घटना रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास एमएसईबी येथील गाळ्यांसमोर घडली. कर्जबाजारी झाल्याने व व्यसनी असल्यामुळे आरोपीचा पत्नीशी कौटुंबिक वाद होता. यातून वैतागून दोन दिवस सदर पिडित महिला घरातून गेली होती. हपरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल आहे. तो अंबाईनगर रेंदाळ येथे भाड्याने रहात होता व एमएसईबी समोर गाळ्यात चिकनचे दुकान चालवत होता. तर समिना चिकन गाडा चालवत होती. रेंदाळ ही त्याची सासरवाडी आहे. २५ दिवसांपूर्वी तो इथला पसारा भरुन मुळगाव कोरोची येथे रहाण्यास गेला होता. नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असल्याने पत्नी सोबत गेली नव्हती.
मयत समिना आपल्या दोन लहान मुलांसह वडिलांना सोबत घेऊन चिकन गाडा चालवत होती.
आज दिवसभर आरोपीने सासऱ्याच्या व पत्नीच्या फोनवर वारंवार फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण फोन न घेतल्यामुळे वैफल्यग्रस्त पतीने बेसावध असणाऱ्या पत्नीवर वार केला. सासरा सलिम नदाफ यांच्या हातांवर वार झाला. पिडित विवाहिता जीवाच्या आकांताने ओरडत पळत सुटली व समोर असणाऱ्या अनिल शिंदे यांच्या इस्त्रीच्या दुकानात शिरली. घाबरलेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात फोन केला तोपर्यंत जीवघेणा पाठलाग करणाऱ्या
ठार झाली तरी आरोपी सपासप वार करत होती. तोपर्यंत जमावाने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जात होता. सपोनी पंकज गिरी यांनी क्षणाचाही विलंब न करता पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग केला. हिरकुडे यांच्या बंगल्यासमोर बाळासो शेटके, मुबारक बागवान, योगेश गायकवाड यांनी त्याचा थरारक पाठलाग करुन पकडले. यावेळी रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली होती. जमावाने या आरोपीला बेदम मारहाण केली. आरोपी अटक असून रात्री उशिरा हुपरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
कौटुंबिक वादातून पत्नीचा खून ( हुपरीतील घटना ; संशयित आरोपीस अटक )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -