Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; वार्षिक योजनेसाठी जिल्ह्याला चारशे कोटीचा निधी मंजूर

कोल्हापूर ; वार्षिक योजनेसाठी जिल्ह्याला चारशे कोटीचा निधी मंजूर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेंतर्गत सन २०२२-२३ साठी ३२२ कोटींचा । आराखडा राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्यात | आला होता. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या वित्तीय मर्यादेत ७८ कोटींची अतिरिक्त भर पडून सन २०२२-२३ साठी ४०० कोटींच्या निधीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेली आणि प्रस्तावित कामे नाविन्यपूर्ण असल्याबद्दल कौतुक करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नवनवीन संकल्पनांचा वापर करुन कोल्हापुरकरांच्या गरजेनुसार 1 नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात. सामाजिक उत्तरदायित्व निधी. जिल्हा वार्षिक योजना आणि लोकसहभागातून अशी कामे करण्यासाठी प्राधान्य
द्यावे.

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ च्या आराखड्याला मान्यता देण्यासाठी राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने झाली. या बैठकीला मुंबईतून पालक सचिव राजगोपाल देवरा तसेच वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतेप

ुण्यातून विभागीय आयुक्त सौरभ राव सहभागी झाले. कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता अधिक आहे. मानव विकास निर्देशांकात राज्यात कोल्हापूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर तर दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर आहे. पूर परिस्थितीमुळे जिल्ह्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून रस्ता दुरुस्ती, जॅकवेलसह बऱ्याच बाबींवर जिल्हा वार्षिक योजनेतून निधी खर्च होतो. तर महिला व बाल विकासासाठी ३ टक्के राखीव निधी ठेवावा लागतो.

राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या बऱ्याच योजनांचे जिल्हास्तरावरील सर्वसाधारण योजनेत हस्तांतर झाले आहे. पण या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत वाढ झाली नाही. आदी सर्व बाबींचा विचार होवून कोल्हापूर जिल्ह्याला निधी वाढवून मिळावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. सन २०२२| २३ च्या आराखड्यात क्लिनिकल स्किल लॅब, सुसज्ज व आधुनिक ग्रंथालय, मत्स्यालय बांधकाम, वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र, सौर कुंपण, जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास आदी कामे प्रस्तावित आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, पर्यटन विकास आणि लोकसंख्या लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्याची विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांना केली.

जिल्ह्याला आणखी वाढीव निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करु, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेले मुद्दे अभ्यासपूर्ण असून याबाबींवर राज्यस्तरावर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -