Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रसोलापूर-अक्कलकोट महामार्गावर चार गाड्यांची एका मागून एक धडक; ६ गंभीर जखमी

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर चार गाड्यांची एका मागून एक धडक; ६ गंभीर जखमी

वर्ध्यातील ४० फूट उंच असलेल्या पुलावरून कोसळलेल्या गाडीतून मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला. यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.

आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक (KA 32 B 1777), चारचाकी (MH 25 AL4070), बलकर ट्रक (MH 12 SX 1171) आणि आणखी एक ट्रक (TN 52 J3679) या चार गाड्यांची एका मागून एक धडक झाली. चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता बोलली जात आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी अतुल भोसले, अजय हांचाटे, पोलीस कर्मचारी दासरी, वाळूनजकार, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी, काळोखे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेन आणि रुग्णवाहिका यांच्या सहाय्याने चारचाकीमध्ये अडकेल्या जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मदतकार्य २ तास सुरू होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -