Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसंपामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, राज्यभर भिक मागत आंदोलन

संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, राज्यभर भिक मागत आंदोलन

हजारो कर्मचारी निलंबित करण्यात आले, तसेच हजारो कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. कित्येक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. आज राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा भिकमांगो आंदोलन केलं आहे.

जवळपास पंधरा दिवस आझाद मैदानात आंदोलन चालल्यावर राज्य सरकारने याची दखल घेत, ऐतिहासिक पगारवाढ केली. मात्र तरीही काही कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम राहिल्याने काही मोजकेच कर्मचारी कामावर हजर राहिले. त्यानंतर ज्या एसटी संघटनेने संप पुकारला होता, त्या एसटी संघटनेनेही संप मागे घेत असल्याची घोषणा केली. तरीही या संपावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले, मात्र अजूनही काही कर्मचारी संपावर आहेत. अनेकदा अल्टिमेटम देऊनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने शासनाने कठोर पाऊलं उचलत कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला, त्यात हजारो कर्मचारी निलंबित करण्यात आले, तसेच हजारो कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. कित्येक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. आज राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा भिकमांगो आंदोलन केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -