Sunday, December 22, 2024
Homeक्रीडारोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास, वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजमध्ये खेळणार

रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास, वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजमध्ये खेळणार

विराट कोहलीला वनडेच्या कॅप्टनशिपवरुन हटवल्यानंतर त्याच्याजागी रोहितची वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि वनडे मालिकेला मुकला होता. विराट कोहलीला वनडेच्या कॅप्टनशिपवरुन हटवल्यानंतर त्याच्याजागी रोहितची वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

वेस्ट इंडिज विरुद्ध सहा फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मर्यादीत षटकांच्या या मालिकेसाठी हार्दिक पांड्याची संघात निवड करणार? ते लवकरच स्पष्ट होईल. सध्या हार्दिक नेटमध्ये सराव करतोय. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत वेंकटेश अय्यरचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. पण तो छाप पाडू शकला नाही. त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूर आणि दीपक चहरने अष्टपैलू म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -