Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात कोरोनाच्या 35 हजार नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाच्या 35 हजार नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं होतं. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. बुधवारी राज्यात 35 हजार 756 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 79 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 39 हजार 857 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 76 लाख 05 हजार 181 वर गेलीय तर आतापर्यंत 71 लाख 69 हजार293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 316 जणांच्या मृत्यूंची नोंद झालीय. बुधवारी राज्यात एकाही ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2858 वर पोहोचली आहे. तर, 1534 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -