Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रबलात्‍कार पीडितेच्या पित्‍याकडून आरोपीची कोर्टाबाहेर गोळ्या झाडून हत्‍या

बलात्‍कार पीडितेच्या पित्‍याकडून आरोपीची कोर्टाबाहेर गोळ्या झाडून हत्‍या

सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणातील आरोपी दिलशाद हुसैन (वय 25) याची न्यायालयाबाहेर पीडित मुलीच्या सैन्यातील निवृत्त जवान असलेल्या पित्याने गोळ्या झाडून हत्या केली. गोरखपूर कोर्टाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी 52 वर्षीय पित्याला अटक केली आहे.

दिलशाद हा पार्किंगमध्ये त्याच्या वकिलाची वाट पाहत थांबलेला होता आणि निवृत्त जवानाने अगदी जवळून त्याच्या डोक्यात गोळी झाडली. आवारातील लोकांनी दिलशादच्या मदतीसाठी धाव घेतली. निवृत्त जवानाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी परवाना असलेली रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली आहे. निवृत्त जवान महाराजगंज गावातील रहिवासी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -