राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले. खुल्या प्रवर्गासाठी 109, अनुसूचित जातीसाठी 17 तर अनुसूचित जमातीसाठी 13 पदे राखीव झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर व शिराळा नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) जाहीर झाले आहे.
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातींसाठी अध्यक्षपदाच्या 17 जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यातील 9 जागा या अनुसूचित जाती (महिला) तर 8 जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती (महिला) राखीव ः लाखणी, कुही, नातेपुते, खंडाळा (जि. सातारा), जळकोट (लातूर), माळेगाव बुद्रूक, पाटण, देहू, वैराग (सोलापूर).