मुंबईसह महाराष्ट्राला लवकरच मास्कपासून स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राला मास्कमुक्त करण्याचा विषय चर्चेला आला. जगभरातील अनेक कोरोनाग्रस्त देश आतापर्यंत मास्कमुक्त झाले आहेत. त्यांच्या उदाहरणांचा अभ्यास करून महाराष्ट्रही मास्कमुक्त करता येईल काय, यावर मंत्रिमंडळाने विचार विनिमय केला. कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्सशी चर्चा करून पुन्हा मंत्रिमंडळाने आढावा घ्यावा आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावी, अशी भूमिका चर्चेअंती निश्चित करण्यात आली.
मास्क लावला नाही म्हणून ज्यांनी दंड भरला त्यांनाच मंत्रिमंडळात झालेली चर्चा किती दिलासादायक आहे याचा अंदाज येऊ शकेल. एकट्या मुंबईत मास्क लावला नाही म्हणून आतापर्यंत 87 कोटी 43 लाख 97 हजार 675 रुपयांचा दंड मुुंबईकरांनी भरला. आतापर्यंत 43 लाख 97 हजार 643 नागरिकांनी हा दंड भरला.