Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुर; हुपरीत तब्बल पाच लाखांची चांदी लुटली

कोल्हापुर; हुपरीत तब्बल पाच लाखांची चांदी लुटली

कोल्हापूर जिल्ह्यात चोरीच्या प्रमाणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काल (दि.२७) हुपरीतील एका युवकाला तब्बल पाच लाखाला लुटण्यात आल्याचे समोर आले आहे. हुपरी जवळ असणाऱ्या रेदाळ येथील बिरोबाच्या माळावर या युवकाला लुटल्याचे समोर आले आहे. त्याच्याजवळ असणारी पाच लाख रुपयांच्या किंमतीची चांदी लंपास करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धूमस्टाईलने दोन मोटार सायकली घेऊन तीन युवकांनी मोपेडवरून चांदी घेवून जाणाऱ्या युवकाला चोरट्यांनी धडक दिली. यानंतर त्याला बोलण्याच्या नादात त्याच्या मोपेडला अडकवलेली चांदी लंपास केल्याचे पोलिसांनी माहिती दिली.
याबाबतची माहिती अशी की येथील चांदी उद्योजक निरंजन शेटे यांच्या चांदी कारखान्यात श्रीधर सदाशिव मोरे (वय ४५) हा कामास आहे.

गुरुवार (दि. २७) रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास बिरदेव मंदीराच्या पाठीमागे असलेल्या माळरानावरील रस्त्यावरून श्रीधर मोरे हा कच्च्या चांदीमालाच्या पिशव्या घेवून मोपेडवरून येत होते. दरम्यान समोरून दोन मोटर सायकल आल्या व त्याला धडक देत त्याचा माल पळवला यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -