Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगट्रकच्या मध्ये लोखंडी पार्टिशन टाकून सुरु होती मद्याची तस्करी ; 32 लाख...

ट्रकच्या मध्ये लोखंडी पार्टिशन टाकून सुरु होती मद्याची तस्करी ; 32 लाख 74 हजाराचा साठा जप्त

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी करणाऱ्या तिघांना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे ट्रकच्या मध्ये लोखंडी पार्टिशन टाकून ही तस्करी होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मध्यप्रदेशातून मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी महामार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, उपनिरीक्षक सागर काळे आणि पथकाला कारवाई करण्याकरिता पाठवले. या पथकाने धुळे तालुक्यातील मुकटी शिवारातील हॉटेल मनकरणी या ठिकाणी सापळा लावला. यावेळी एमपी 0 9 एच एफ 99 91 क्रमांकाची ट्रक या हॉटेल जवळ आढळून आली. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये कोणताही माल नसल्याचे दिसून आले.

मात्र बाहेरून ट्रकची लांबी पाहता आतमध्ये फेरफार असल्याचा संशय पोलीस पथकाला आला. त्यामुळे त्यांनी गाडीची ताडपत्री काढली असता ट्रकच्या बॉडी मध्ये दोन पार्टिशन केल्याची बाब लक्षात आली. आतल्या भागांमध्ये ऑल सीजन कंपनीचे मद्याचे 255 बॉक्स आढळून आले. याची किंमत बत्तीस लाख 74 हजार असून ट्रकची किंमत दहा लाख रुपये आहे. विशेष म्हणजे या ट्रकमधील मद्य साठा सुरक्षित पोहोचवण्यासाठी जिजे 06 सी एफ 2133 कंपनीची स्कार्पिओ देखील वापरण्यात आली. या स्कार्पिओ मधील दोन जण ट्रकची पायलेटिग करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -