Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात कॉलेजमध्ये हाण की बडीव ! व्हॉट्सॲप स्टेट्सवरून दोन गावच्या युवकांची तुंबळ...

कोल्हापुरात कॉलेजमध्ये हाण की बडीव ! व्हॉट्सॲप स्टेट्सवरून दोन गावच्या युवकांची तुंबळ हाणामारी

असाच स्टेटस का लावलास या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळतिट्टा याठिकाणी आदमापूर आणि मुदाळ या दोन गावातील युवकांमध्ये आज (दि.२८) शुक्रवारी सकाळी तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की असा स्टेटस का लावलास याची विचारपूस केल्याच्या कारणावरून मुदाळ आणि आदमापूर या दोन्ही गावातील युवकांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी तुंबळ हाणामारी झाली.

सकाळची वेळ असल्यामुळे मुरगुड, गारगोटी, मुदाळ, बिद्री, सरवडे, सोळांकुर या ठिकाणी जाणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांचा मोठा जमाव झाला होता. अशा वेळी ही मारामारी झाल्याने सर्वजण एकत्र आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा जमाव झाला.

सुरवातीला शाब्दिक चकमक झाली. नंतर हमरीतुमरी व मारामारी झाली. प्रकरण हाताबाहेर जाताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. भुदरगड व मुरगुड पोलिसांनी तत्परता दाखवल्याने जमाव पांगवण्यात यश आले. पोलीस व स्थानिक मध्यस्थांच्या मार्फत सदरचे प्रकरण त्वरित थांबवण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -