Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंग'सेमी इंग्लिश मीडियम'च्‍या भीतीने नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

‘सेमी इंग्लिश मीडियम’च्‍या भीतीने नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

सातार्‍यातील एका उपनगरात नववीत शिकणार्‍या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली. प्राथमिक माहितीनुसार ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ या कारणातून तिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पोलिस तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी दुपारी संबंधित मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी तिने पंख्याला गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसर हादरून गेला. शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

पोलिसांना तेथे चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीमध्ये कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हणत, सेमी इंग्लिश मीडियम नको असल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात दाखल झाली असून पोलिस तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -