Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनअखेर श्वेता तिवारीने त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मागितली माफी, म्हणाली…

अखेर श्वेता तिवारीने त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मागितली माफी, म्हणाली…

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आहे. आगामी वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान श्वेता तिवारीने देवाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे श्वेता तिवारीवर जोरदार टीका आणि सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अखेर या वक्तव्याप्रकरणी श्वेता तिवारीने स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या निवेदनात श्वेता तिवारीने सांगितले की, ‘माझ्या वक्तव्याचा गैरवापर करण्यात आला आहे. पण माझ्या बोलण्याने किंवा माझ्या कृतीने कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही मी नकळत लोकांना दुखावले आहे. त्यामुळे मी सर्वांची माफी मागते.’

श्वेता तिवारीने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, ‘माझ्या लक्षात आले आहे की माझ्या एका सहकाऱ्याशी संबंधित माझ्या वक्तव्याचा हवाला देत विपर्यास करून ते मांडले गेले आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. व्हिडिओ नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की सौरभ राज जैन यांनी साकारलेल्या देवाच्या लोकप्रिय पात्रासाठी मी ‘देव’ हा शब्द वापरला आहे. लोक अनेकदा एखाद्या अभिनेत्याचे नाव त्याच्या पात्राशी जोडतात आणि अशा परिस्थितीत मी माध्यमांशी संवाद साधताना हेच उदाहरण वापरुन बोलले होते. पण माझ्या वक्तव्याचा गैरवापर करण्यात आला. हे खूपच खेदजनक आहे. माझी देवावर खूप श्रद्धा आहे आणि एक भक्त म्हणून माझ्याकडून जाणूनबुजून किंवा इतर कोणत्याही प्रकारे असा प्रकार होणे शक्य नाही. तसंच, नकळत एखाद्याच्या भावना दुखावण्याचे कृत्य मी करणार नाही.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -