Monday, November 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची गळफासाने आत्महत्या

कोल्हापूर : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची गळफासाने आत्महत्या

कांडवण (ता. शाहूवाडी) येथील 21 वर्षीय तरुणीने अमोल संजय सुतार या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून अमोल सुतारला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयित अमोल सुतार हा कांडवण (ता. शाहूवाडी) येथील रहिवासी आहे. फिर्यादी महिलेची 21 वर्षीय मुलगी आणि अमोल सुतार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी समजले होते.

घरच्यांनी समजावल्यानंतर तरुणीने हे प्रेमसंबंध संपुष्टात आणले होते. मात्र, अमोलने प्रेमसंबंध कायम ठेवण्याचा तिच्यामागे तगादा लावला होता. तरुणीच्या मोबाईलवर संदेश पाठवून, ‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मी जीव देईन,’ असे वारंवार धमकावून अमोल सुतार तरुणीस मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरातील बडोद्याला गळफास लावून मंगळवारी आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने गुरुवारी रात्री शाहूवाडी पोलिसांत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -