Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाआधी हिट है बॉस! धोनीच्या मित्राने 13 चेंडूत कुटल्या 70 धावा, CSK...

आधी हिट है बॉस! धोनीच्या मित्राने 13 चेंडूत कुटल्या 70 धावा, CSK त्याला पुन्हा घेणार?

मेगा ऑक्शनच्या तयारीसाठी महेंद्रसिंह धोनी चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये होणार आहे. मेगा ऑक्शनआधी काय स्ट्रॅटजी असली पाहिजे, ते सर्व ठरवण्यासाठी धोनी चेन्नईमध्ये पोहोचला आहे. कुठल्या खेळाडूला निवडायचं कोणाला नाही हे सर्व ठरवायचं आहे. या दरम्यान न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने धमाकेदार खेळ दाखवला आहे. सँटनरने न्यूझीलंडच्या देशांतर्गत सुपर स्मॅश लीगच्या फायनलमध्ये धडाकेबाज खेळ दाखवला आहे. त्याने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्या फलंदाजीच्या बळावर नॉर्दन डिस्ट्रिक्ट संघाने 20 षटकात तब्बल 217 धावा कुटल्या. IPL स्पर्धेत मागच्या सीजनपर्यंत मिचेल सँटनर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता.

या सीजनमध्ये सँटनरला चेन्नईने रिटेन केलेले नाही. सँटनरचा सध्याचा फॉर्म पाहता CSK ची थिंक टँक सँटनरला पुन्हा एकदा संघात घेण्याविषयी नक्कीच विचार करेल. धोनीच्या या मित्राने न्यूझीलंडच्या देशांतर्गत स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -