कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्गामुळे देशातील काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोनाचे नवे व्हेरियंट येत राहणार, असा दावा काही संशोधक करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा भय किती दिवस राहणार? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात कायम आहे. मात्र आता जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिका द लॅन्सेटच्या नुकताच प्रकाशित झालेल्या अंकात अमेरिकेतील संशोधकांनी कोरोनाबाबत नवे संशोधन मांडले आहे. या नव्या संशोधनातील निष्कर्षामुळे संपूर्ण जगाला दिलासा मिळाला आहे.
मार्चनंतर होईल कोरोना महामारीचा अंत
‘द लॅन्सेट’च्या १९ जानेवारीच्या अंकात अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील आरोग्य मूल्यमापन संशोधन केंद्राचे डॉ. ख्रिस्तोफर जे. एल. मरे यांचा लेखात म्हटलं आहे की, नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत जगभरातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असेल. मात्र यानंतर कोरोना महामारीचा अंत होईल. म्हणजे कोरोना महामारी येणार नाही तर कोराना हा सर्दी आणि खोकल्यासारखा वारंवार होणार्या आजारा सारखाच असेल. तसेच कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाउन करण्याची आवश्यकता असणार नाही, असेही मरे यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आवश्यकच
लसीकरण झालेल्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. सध्या लस न घेतलेल्यांना ओमायक्रॉनची लागण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच ज्या देशांमध्ये अद्याप ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला नाही येथे मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन यामुळे कोरोना प्रतिबंधाला मदत होते, असेही अहवालात म्हटलं आहे.
ओमायक्रॉनचील लाट ओसल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणारच आहे;पण महामारी संपलेले असेल. तसेच कोरोना संसर्ग होण्याचे जगभरातील प्रमाण हे ५ ते २० टक्के एवढेच असेल, असेही त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.