ताजी बातमी ऑनलाइन टीम
चहा (tea) पिण्यामध्ये एक वेगळीच नशा आहे, काही लोकांना दिवसाला कित्येक कप चहा लागतो. चहा शिवाय कित्येकांना सर्वकाही अर्धवट वाटते. मग काही पाहूणे आल्यास त्यांच्या स्वागतासाठी चहापाणी केले जाते. खूप लोक असेही आहेत जे बेड-टी (Bed-tea) घेतात. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा घेतात. शहर असो की गाव आज काल कित्येकांच्या घरांमध्ये बेटी टी कल्चर दिसून येते. पण तुम्हाला माहितीये का रिकाम्या पोटी चहा पिण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतो
onlymyhealth मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, सकाळी रिकाम्या पोटी (tea)चहा पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने कोणत्या समस्या येऊ शकतात, जाणून घेऊ या.
थकवा आणि चिडचिड:
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने उत्साह आणि ताजेपणा येतो असे वाटत असेल हा फक्त तुमचा गैरसमज आहे. असे केल्याने तुम्हाला पूर्ण दिवस थकवा जाणवतो आणि यामुळे तुमचा मूडही खराब होऊ शकतो. त्यामुळे अशा समस्या टाळण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नका.
घाबरल्यासारखे होणे किंवा मळमळ होणे:
सकाळी -सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे घाबरल्यासारखे होणे किंवा मळमळ होते. कारण त्याचा पोटात Bile juice तयार करण्याच्या आणि काम करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे या समस्यामुळे वाचण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी चहा बंद करा.
पचन क्रियेवर परिणाम:
रिकाम्यापोटी चहा पिण्यामुळे चांगल्या बॅक्टेरियांना नुकसान पोहचते. आपल्या आरोग्य आणि विशेषत: पचन क्रिया व्यवस्थित काम करण्यासाठी या बॅक्टेरियासाठी महत्त्वाची भूमिका होते. पचन क्रिया व्यवस्थित काम करण्यासाठी आम्हाला रिकाम्यापोटी चहा पिणे टाळले पाहिजे
वारंवार लघवीची समस्या:
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानेही वारंवार लघवीला जावे लागते. चहामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ डाईयरिटीक तत्त्व मिळले जातो. जे लघवी बनवण्याच्या प्रक्रियेला गती देते. शरीरामध्ये पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशनची समस्या देखील होऊ शकते.
श्वासाची दुर्गंधी:
या सगळ्याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडीटी आणि तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा पिणे शक्यतो टाळावे.
tea | सावधान ! सकाळी रिकाम्या पोटी चहा पिताय?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -