Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमध्यरात्रीच प्रेयसीला भेटायला गेला आणि दाट धुक्यामुळे थेट विहिरीत पडला !

मध्यरात्रीच प्रेयसीला भेटायला गेला आणि दाट धुक्यामुळे थेट विहिरीत पडला !

लखनौच्या सरोजिनीनगरच्या बिजनौर भागात प्रेयसीला भेटायला गेलेला तरुण खोल विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्या तरुणाला बाहेर काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनलालगंज परिसरात राहणाऱ्या तरुणाचे सरोजिनीनगरमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

दोघेही सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास बिजनौर परिसरातील माटी गावाजवळ पोहोचले होते. यावेळी दाट धुक्यामुळे हा तरुण खोल विहिरीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी त्याची मैत्रीणही विहिरीजवळ होती. तो तरुण विहिरीत पडल्यानंतर ती तिथेच थांबून ओरडू लागली. आरडाओरडा ऐकून तेथे आलेल्या ग्रामस्थांनी ४० फूट खोल विहिरीत एक तरुण असल्याचे पाहिले.

तो तरुणही मदतीसाठी ओरडत होता. गावकऱ्यांनी बिजनौर पोलिसांना माहिती दिली. बिजनौरचे प्रभारी निरीक्षक राजकुमार घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांच्या मदतीने सुटका करून दोरीच्या सहाय्याने तरुणाला विहिरीतून बाहेर काढले. खोल विहिरीत पडल्यामुळे तरुण जखमी झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -