Thursday, February 6, 2025
Homeमनोरंजननागराज मंजुळेच्या 'झुंड'चा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी होणार रिलीज

नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी होणार रिलीज

ताजी बातमी ऑनलाइन टीम

फँड्री, सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी काहीतरी नवी कथा घेऊन येतोय. या वर्षी त्याचा झुंड हा चित्रपट रिलीज होतोय. झुंड कोणत्या दिवशी रिलीज होणार याची रिलीज डेट समोर आलीय. या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. खुद्द अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही बातमी दिलीय की, झुंड कुठल्या दिवशी रिलीज होतोय.

झुंड’ हा भा एक हिंदी क्रीडा चित्रपट आहे. झोपडपट्टी सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन एका प्राध्यापकाची भूमिका साकारत आहेत. रस्त्यावरच्या मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करून फुटबॉल संघ सुरू करतो, अशी त्यांची भूमिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -