Friday, November 22, 2024
Homeआरोग्यविषयक6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना मिळणार कोरोना लस

6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना मिळणार कोरोना लस

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कोरोना आणि त्याचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, आता 6 महिने ते पाच वर्षे वयोगटातील लहान मुलांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. फायझर आणि बायोएनटेक या दोन कंपन्यांनी लहान मुलांसाठी कोरोना लस विकसित केल्या आहेत. दोन्ही कंपन्या आता पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना कोविड-19 लस देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या संदर्भात अमेरिकन आपत्कालीन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. याबाबत अमेरिकन मीडियाने मंगळवारी वृत्त प्रकाशित केले आहे. अमेरिकेत यापूर्वी पाच वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी बाकी असलेला हा शेवटचा वयोगट आहे. आपत्कालीन प्राधिकरणाकडून मंजुरी मिळल्यानंतर लहान बालकांचे लसीकरणही सुरू होणार आहे.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आणि वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, फायझर आणि बायोएनटेक, या दोन्ही कंपन्यांनी 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना कोरोना लस देण्यासाठी आपात्कालीन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. अमेरिकेत सध्या ओमिक्रॉनचा संसर्ग आटोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमेरिकेत शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि कोरोना लसीकरणावरून पालकवर्ग चिंतेत दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -