Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेनोराने चाहत्यांना पिकनिकला येण्याची दिली भन्नाट ऑफर

नोराने चाहत्यांना पिकनिकला येण्याची दिली भन्नाट ऑफर

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या गायक गुरु रंधावासोबतच्या ‘नाच मेरी रानी’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. तर सध्या नोरा नुकतीच कोरोनामुक्त होऊन सुट्टी एन्जॉय करण्याच्या मुडमध्ये दिसत आहे. यासाठी नोराने आपल्यासोबत ट्रिपला येण्याची ऑफर चाहत्यांना दिली आहे. सर्वांत बोल्ड, ब्युटीफूल अभिनेत्रीपैकी नोरा फतेही एक आहे. नोराला ‘नाच मेरी रानी’ या गाण्याच्या प्रमोशनवेळी कोरोनाची लागण झाली होती. यातून ती बरी झाली असून तिने आपल्या कामाला सुरूवात केली आहे. सध्या नोरा दुबईत कामासोबत सुट्टीच्या आनंद घेत आहे.

याच दरम्यान नोराने ब्लॅक रंगाच्या स्विमसूटमधील एक फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती एका स्विमिंग पूलाच्या बाजूला हटके अंदाजात दिसत आहे. यावेळी नोराच्या एका हातात मोबाईल तर दुसरा हात तिने आपल्या मानेला लावल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना नोराने आपल्या चाहत्यांसाठी तिच्यासोबत ट्रिपला येण्याची भन्नाट ऑफर दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नोराने ‘मी माझ्या पुढच्या सुट्टीचे नियोजन करत आहे. कोणाला माझ्यासोबत यायचे आहे का?’ असे विचारले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -