केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये डीजिटलायझेशनवर जास्त भर देण्यात आला आहे. त्या पैकी एक म्हणजे ई पासपोर्ट सुविधा. भारतीयांना 2022-23 पासून ई पासपोर्ट वापरता येणार आहे. हा पासपोर्ट सामान्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असून, याच्या सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि फ्यूचर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हा पासपोर्ट देखील पूर्वीच्या पासपोर्ट प्रमाणेच काम करणार आहे. मात्र आता यामध्ये केवळ एक चीप असेल. या ई पासपोर्ट मध्ये असलेली मायक्रोचीप प्रवाशाची माहिती रेकॉर्ड करू शकेल. या पासपोर्ट मध्ये पासवर्ड द्वारे बायोमेट्रिक डाटा भरला जाणार आहे. यामुळे जगभरात इमिग्रेशन साठी लागणारा वेळ वाचणार आहे. या पासपोर्ट ची निर्मिती नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेस मध्ये होणार आहे.
पासपोर्ट बायोमेट्रिक डेटावर आधारित असल्याने तोअधिक सुरक्षित असणार आहे.
ई-पासपोर्टच्या मदतीने प्रवाशाची ओळख सुरक्षित होते आणि गोपनीयतेचेही रक्षण होते.
या पासपोर्टमुळे फ्रॉडसारख्या घटनांनाही आळा घालण्यास मदत होईल.
पासपोर्ट आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (IACO) मानकांनुसार असेल.
पासपोर्टवरील चिप रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) द्वारे अनधिकृत डेटा प्रतिबंधित करेल.