कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेलेे काही निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे पाच या वेळेत लागू केलेली संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी प्रसिद्ध केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
दि. 9 जानेवारीपासून जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. अत्यावश्यक कारणांशिवाय रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली होती. राज्य शासनाने ज्या जिल्ह्यांत 18 वर्षांवरील 90 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा पहिला डोस आणि 70 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे दुसर्या डोससह लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.