Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगली: ‘त्या’ कर्मचार्‍याची जाणार नोकरी; दाखल होणार गुन्हा

सांगली: ‘त्या’ कर्मचार्‍याची जाणार नोकरी; दाखल होणार गुन्हा

महापालिकेकडील पाणी बिल घोटाळ्यातील मानधनावरील कर्मचार्‍याची नोकरी जाणार आहे. संबंधित कर्मचार्‍यावर फौजदारी गुन्हाही दाखल होणार आहे. तसे आदेश आयुक्‍त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. दरम्यान, पाणी बिलासंदर्भात नगरसेवकांकडे ग्राहकांच्या तक्रारी सुरूच आहेत.

महापालिकेच्या एका मानधनावरील लिपिकाने पाणी बिलात 25 हजार रुपयांचा अपहार केल्याचे कबूल केले आहे. या लिपिकाने 50 हजार रुपये घेतले; पण महापालिकेत जमा केले नाहीत, अशी तक्रार ग्राहकाची होती. दरम्यान, पाणी बिलातील अपहाराच्या तक्रारी वाढत आहेत. बिल भरण्यासाठी पैसे घेतले; पण पावती दिली नाही आणि आता पाण्याचे बिलही दिले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -