Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर: व्यावसायिकावर हनी ट्रॅप; 2 लाखांची मागणी

कोल्हापूर: व्यावसायिकावर हनी ट्रॅप; 2 लाखांची मागणी

ओळखीतून व्यावसायिकाला हनी ट्रॅप मध्ये ओढून दोन लाख रुपयांची मागणी करणार्‍या टोळीविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये अजित संभाजी निंबाळकर (रा. सुभाषनगर), चंदू शिंदे या दोघांसह आणखीन दोन महिलांचा समावेश आहे.

या व्यावसायिकाची एका मित्रामार्फत तरुणीशी ओळख झाली. 8 फेब्रुवारी 2021 रोजी या तरुणीने संबंधित व्यापार्‍याला एका हॉटेलमध्ये बोलावले होते. या भेटीनंतर तिने साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू केला.
त्यानंतर तरुणीने या व्यावसायिकाला स्वत:चे काहीतरी बरे-वाईट करून घेण्याची तसेच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. प्रकरण
मिटविण्यासाठी तिने व तिच्या साथीदारांनी या व्यावसायिकाकडे 2 लाख रुपयांची मागणी केली.

या टोळीविरोधात यापूर्वी हनी ट्रॅपप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी पुन्हा नव्याने आलेल्या तक्रारीत याच टोळीची नावे निष्पन्‍न झाल्याने पोलिस पथक त्यांच्या अटकेसाठी पाठविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. अशाप्रकारे आणखी कोणाची फसगत झाली असेल; तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधवा, असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -