Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगदहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं, बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येणार :...

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं, बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येणार : वर्षा गायकवाड

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा,केंद्रीय अर्थसंकल्पातील शिक्षणाविषयीची तरतूद आणि पहिली दुसरीचा अभ्यासक्रम यावर भाष्य केलं. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षा गायकवाड यांनी अभ्यास करण्याचं आवाहन केलं. दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आवाहन आहे की आपण अभ्यासावर लक्ष केंद्रीत कराव, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन शिक्षण धोरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन परीक्षांसाठी आंदोलन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षा गायकवाड यांनी अभ्यास करण्याचं आवाहन केलं. दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीनं काम करण्यात येत आहे. बोर्डाकडून अधिक माहिती मिळेल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -