Friday, January 30, 2026
Homeमनोरंजनधोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मैदानावर एक नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच त्याच्या चाहत्यांमध्ये एका नव्या अवतारात दिसणार आहे. धोनी आता एका ग्राफिक कादंबरीवर आधारित वेब सीरिज(Web Series)मध्ये राक्षसांना धूळ चारताना दिसणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर धोनी आक्रमक खेळाडू म्हणूनच ओळखला जात होता. आता डिजीटलच्या मैदानात धोनीनं एन्ट्री केलीय. तिथंही तो धमाकेदार खेळ करणार, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. धोनीनं त्याच्या नवीन वेब सिरीज ‘अथर्व: द ओरिजिन'(Atharva-The Origin)चा फर्स्ट लूक जारी करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. टीझर(Teaser)मध्ये धोनीचा सुपरहिरो अवतार पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. याचे लेखन थमिलमणी यांनी केलं आहे, तर आदिकलराज आणि अशोक मनोज यांनी निर्मिती केली आहे.

या ग्राफिक नॉव्हेलची घोषणा 2020मध्ये झाली होती. याची घोषणा खुद्द धोनीची पत्नी साक्षीनं केली होती. फर्स्ट लूकमध्ये धोनी युद्धभूमीवर अॅनिमेटेड अवतारात दिसत आहे. यामध्ये तो राक्षसांचा वध करताना दिसत आहे. त्याचा टीझर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. लोकांना धोनीचा लूक प्रचंड आवडलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -