ताजी बातमी ऑनलाइन टीम
मुंबई: IPL 2022 च्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. प्रत्येक संघ यंदाच्या सीजनसाठी रणनिती आखत आहे. फक्त चालू मोसमच नाही, तर भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचा प्रत्येक फ्रेंचायजीचा प्रयत्न आहे. म्हणूनच आता खेळाडू विकत घेताना, प्रत्येक संघाची काही ना काही रणनिती असणार आहे. परदेशातील नामांकित खेळाडूंप्रमाणे देशातील युवा खेळाडुंसाठीही मोठी बोली लागणार आहे. भारतीय संघातून खेळणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) यंदा सर्वात जास्त लक्ष असेल.
यंदाच्या सीझनमधला तो सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो , असा माजी क्रिकेटपटू आकाशा चोप्रा यांचं मत आहे. श्रेयसवर बहुतांश फ्रेंचायजी बोली लावतील. पण कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन संघांमुळे श्रेयसला आपल्या संघात घेण्यासाठी प्रामुख्याने चुरस असेल. भावी कर्णधार असाच विचार करुन, या दोन टीम्स श्रेयसवर बोली लावतील.
रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स, क्विंट डिकॉक, शिखर धवन, फाफ डु प्लेसिस, कागिसो राबाडा, मोहम्मद शमी आणि डेव्हिड वॉर्नर या क्रिकेटपटूंवर सुद्धा मोठी बोली लागू शकते. खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयसला IPL 2021 च्या पहिल्या भागामध्ये खेळता आले नव्हते. त्यामुळे ऋषभ पंतला दिल्लीचं कर्णधारपद देण्यात आलं. त्यानंतर श्रेयस अय्यर परतल्यानंतरही ऋषभ पंतच दिल्लीचा कर्णधार होता.
“श्रेयस अय्यर केकेआर आणि आरसीबीचा कर्णधार बनू शकतो. पंजाब त्याचा विचार करणार नाही. अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरु शकतो” असे आकाश चोप्रा यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर म्हटलं आहे.
IPL 2022: मुंबईचा मुलगा बनू शकतो RCB किंवा KKR चा कॅप्टन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -