बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन पत्नी सुझैनबरोबर वेगळं होऊन खूप वर्षे झालीत. आता त्याच्या नव्या अफेयर्सबाबतीत चर्चा सुरु झाल्या आहेत आणि जिच्याबरोबर चर्चा सुरु आहेत ती आहे मिस्ट्री गर्ल सबा आझाद…
ऋतिकबरोबर एका हॉटेलमध्ये जाताना सबा आझाद स्पॉट झाली, तेव्हापासून ऋतिकबरोबर सबाचं नाव जोडलं जाऊ लागलं आहे. त्यांच्या जवळिकतेबाबत नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. ऋतिक आणि सबा कधीपासून रिलेशनमध्ये आहेत, याचे अंदाज लावले जात आहेत.
हृतिक रोशन आणि सबा नुकतेच स्पॉट झाले होते. दोघांनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सबाला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा प्रश्न ती अनेक वेळा टाळताना दिसत होती. आता हे दोघे पुन्हा कधी एकत्र दिसणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
मिस्ट्री गर्ल सबा आझाद अभिनयाचे सम्राट नसीरुद्दीन शहा यांचा मुलगा इमाद शाहबरोबर 7 वर्ष लिव्ह इनमध्ये होती. इमाद शाह बद्दल बोलायचे तर, तो ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा आहे आणि तो काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला लाईम लाईटपासून दूर राहायला आवडतं. परंतु सबाबरोबरच्या अफेयर्सनी तो अचानक चर्चेत आला. सबा आणि इमाद 7 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले. परंतु त्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
सबा अभिनेत्री, थिएटर दिग्दर्शक संगीतकार आणि गायिकाही आहे. सबा ‘मुझसे दोस्ती करोगे ‘ मधील तिच्या प्रमुख भूमिकेसाठी ओळखली जाते. हा चित्रपट भारतात एक सुपर हिट ठरला आणि देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही चित्रपटाने मोहिनी घातली. तिने 2016 मध्ये Y-Films वेब सीरिज, Ladies Room मध्ये देखील डिंगोची भूमिका साकारली होती