Friday, February 7, 2025
Homeतंत्रज्ञानInstagram यूजरसाठी आनंदाची बातमी

Instagram यूजरसाठी आनंदाची बातमी

ताजी बातमी ऑनलाइन टीम

फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने (instagarm reels) शॉर्ट व्हिडिओ मार्केटमध्ये स्वतःला शीर्षस्थानी आणण्यासाठी आपली सर्व ताकद लावली आहे. वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी कंपनी सतत या श्रेणीमध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडत आहे. आता कंपनी यामध्ये 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवण्याचा पर्याय देणार आहे. आतापर्यंत, वापरकर्त्यांना 60 सेकंदांपर्यंत व्हिडिओ बनवण्याचा पर्याय मिळत होता.

अहवालानुसार, मेटा (Meta) मालकीचे इंस्टाग्राम गेल्या काही दिवसांपासून आपल्या रील सेगमेंटसाठी 90 सेकंदांपर्यंत व्हिडिओ बनवण्याच्या वैशिष्ट्यावर काम करत आहे. याची चाचपणी सुरू आहे. ते लवकरचं सर्व वापरकर्त्यांसाठी रिलीज करणार असल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर तुम्ही इंस्टाग्राम रील्सवर (instagarm reels) 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवू आणि टाकू शकाल. अलिकडच्‍या काळात इंस्‍टाग्रामने रील सेग्मेंटमध्‍ये अनेक नवीन फिचर्स जारी केले आहेत. यात कॅप्शन टू रीमिक्सचा पर्याय देखील समाविष्ट आहे. आणखी बऱ्याच फीचर्सवर काम सुरू आहेत. जी येत्या काही महिन्यांत प्रसिद्ध होऊ शकतात.

Instagram Reels वर, तुम्हाला सध्या 15 सेकंद आणि 60 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्याचा पर्याय मिळतो. कंपनीने गेल्या वर्षी 60 सेकंदांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिला होता. लहान व्हिडिओ क्षेत्रातील टिकटॉक आणि इतर अॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीकडून हा कालावधी आणखी वाढवला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -