Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : करणीच्या नावाखाली 25 हजारांची मागणी

कोल्हापूर : करणीच्या नावाखाली 25 हजारांची मागणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम
तुमच्यावर करणी झाली आहे, तुमच्यावर फार वर्षांपासून संकट आहे. त्यामुळे घरात शांती नाही, असे सांगत होमहवन करण्यासाठी 25 हजारांची मागणी करणार्‍या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. सृष्टी राजेश मोरे (वय 40, रा. शाहूपुरी, कुंभार गल्‍ली) असे तिचे नाव आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली एकाकडून 12 तोळे दागिने व 3 लाखांची रक्‍कम घेतल्याचीही तक्रार पुढे आली आहे.

शाहूपुरी पाचवी गल्‍ली येथे सृष्टी मोरे नावाची महिला लोकांची नजर बघून, चेहरा बघून भविष्य सांगते. तिने खोट्या नावाचा वापर करून एका व्यक्‍तीकडून 12 तोळे दागिने व रोख 3 लाख रुपये घेतले असून हे पैसे परत करण्यास ती टाळाटाळ करत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील व गीता हासूरकर यांच्याकडे आली होती.

यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सिमा पाटील, गिता हासूरकर यांच्यासह साध्या वेशातील पोलिसांनी महिलेचे घर गाठले. त्यांची घरची परिस्थिती व इतर माहिती घेत तिने तुमच्यावर करणी झाली असून ते काढण्यासाठी तसेच संबंधित व्यक्‍तीचे दागिने व रोख रक्‍कम परत करण्याआधी होमहवन करण्यासाठी 25 हजारांची मागणी केली. यापैकी 5 हजार रुपये तिने स्वीकारले.

पोलिसांनी टाकला छापा

संबंधित महिलेने हे पैसे स्वीकारल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. तिच्या खोलीतून ज्योतिषशास्त्राचे पुस्तक, अंगार्‍याच्या पुड्या, नारळ, लिंबू असे साहित्य जप्‍त केले. संशयित महिलेवर भा.दं.वि. सं. कलम 420, जादुटोणा प्रतिबंध व समुळ उच्चाटन अधिनियम 2013 चे कलम 2 र्1िें र्खिें मधील 1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईमध्ये महिला कॉन्स्टेबल वनिता धारगे, कॉन्स्टेबल सुशांत सावंत, महेश नाईक, अनिकेत डोंगळे यांनी भाग घेतला.

पैसे, नावांच्या नोंदी

संशयित महिलेच्या घरात पोलिसांना दोन वह्या मिळून आल्या आहेत. यामध्ये तिने कोणाकडून किती पैसे घेतले याच्या नोंदी असल्याची माहिती समोर येत आहे. या वहीत अनेक उच्चशिक्षित, सरकारी नोकरदार, राजकीय, नामांकित व्यक्‍तींची नावे समाविष्ट असल्याचे बोलले जात आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या अशांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -