Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात 311 नवे कोरोना रुग्ण : नऊ जणांचा बळी

कोल्हापूर जिल्ह्यात 311 नवे कोरोना रुग्ण : नऊ जणांचा बळी

ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात ३११ नवे कोरोना बाधित आढळून आले, तर ६५० जण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे कोरोनाचे सक्रीय रुग्णांची संख्या आता ३०५७ इतकी झाली आहे. मात्र कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी दिवसभरात २४८२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ३११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये आजरा-१, भुदरगड-२, चंदगड४, गडहिंग्जल-१८, गगनबावडा२, हातकणंगले-२०, कागल-१३, करवीर-३९, पन्हाळा-१३, राधानगरी-५, शाहुवाडी-२१ आणि शिरोळ तालुका-११ तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात-१२२,

इचलकरंजी आज
१५ रूग्णांची भर गुरवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात १५ रूग्णांची भर पडली तर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ५९ जणांवर उपचार सुरू आहेत. आज मिळालेल्या अहवालानुसार मगदूम मळा, शहापूर भागात प्रत्येकी ३, आर.के.नगर, कारंडेमळा भागात प्रत्येकी २ तर महासत्ता चौक, वेताळपेठ, सहकारनगर, स्टेशन रोड, जवाहरनगर आदि भागात प्रत्येकी १ रूग्ण आढळून आला. जयसिंगपूर पालिका-४, गडहिंग्लज नगरपरिषद-४, कागल नगरपरिषद२, पेठवडगांव नगरपरिषद-१ आणि अन्य जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -