Sunday, February 23, 2025
Homeनोकरी'या' बँकेत शिपाई पदांची भरती सुरू : पदसंख्या, पात्रता सविस्तर माहिती...

‘या’ बँकेत शिपाई पदांची भरती सुरू : पदसंख्या, पात्रता सविस्तर माहिती वाचा आत्ताच

ताजी बातमी ऑनलाईन टीम
इथ पर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी आता एक मोठी संधी प्राप्त झाली आहे. या उमेदवारांसाठी आता एका बँकेत शिपाई पदाची भरती सुरू झाली आहे. ही भरती पंजाब नॅशनल बँक मुंबई येथे शिपाई या पदासाठी निघाली आहे.

पदाचे नाव :
शिपाई (Peon)
पदसंख्या – 20

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
यासाठी उमेदवारांनी बारावी शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. याच बरोबर इंग्रजी आणि मराठी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे.

अखेर बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात ! पहा व्हिडिओ



हे लक्षात घ्या की या पदभरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार नाहीत.

वयोमर्यादा :
उमेदवाराचं वय हे 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा : उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करावा. म्हणजेच काय तर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पंजाब नॅशनल बँक, मुंबई पश्चिम मंडल कार्यालय, पहिला मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, दादर मुंबई – 400025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022

टीप :
या पदांसाठी अर्ज हे केवळ पोस्ट किंवा स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष पाठवण्यात आलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज पात्र असणार नाहीत.
उमेदवारांनी अर्जासोबत डोमेसाइल सर्टिफिकेट पाठवणं आवश्यक असणार आहे.
मागासवर्गीय किंवा OBC प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला पाठवणं आवश्यक असणार आहे.

(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -