Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रघरात घुसून बलात्काराची धमकी देणार्‍या तरूणाला बेड्या

घरात घुसून बलात्काराची धमकी देणार्‍या तरूणाला बेड्या

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एचआर मॅनेजर महिलेला अश्लिल मेसेज पाठवून, घरात घुसून बलात्कार करण्याची धमकी देणार्‍या तरूणाला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गोविंद बेहरे (रा. फ्लॅट न1, शांतीनगर, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरील एका कार्यालयात फिर्यादी महिला एचआर मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्या कार्यालयातच बेहरे हा कामास होता. त्याची कार्यालयातील महिला सहकार्‍यांशी असणारी वागणूक योग्य नव्हती. तसेच त्याने कार्यालयातील एका महिलेलाही अपमानस्पद वागणूक दिली होती. या कारणावरून महिला फिर्यादीने बेहरे यास कामावरून काढून टाकले. याचा राग मनात धरून, बेहरेने त्यांना अश्लिल मसेज पाठवत, शिवीगाळ केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -