Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरशिवसेनेतील दुहीचा फायदा आवाडे गटाने उचलला

शिवसेनेतील दुहीचा फायदा आवाडे गटाने उचलला

हातकणंगले 2017 पंचायत समीती निवडणूकीमध्ये भाजपा ( ६), जनसूराज्य ( ५), आवाडे गट ( ५), स्वाभिमानी ( २ ), शिवसेना ( २ ) काँग्रेस -१व अपक्ष -१ असे बलाबल आहे. भाजपा – जनसूराज्य व इतर पक्षांच्या सहकार्याने भाजपा -व जनसुराज्य मध्ये सभापती उपसभापती पद वाटून घेतले होते. नुकत्याच ३ जानेवारी झालेल्या सभापती निवडीमध्ये भाजपाच्या सोनाली पाटील यांना निर्विवाद सभापतीपद मिळाले होते. परंतु उपसभापतीसाठी पिंटू मुरूमकर ( रूकडी ) व अरुण माळी ( प. कोडोली ) या दोघांनीही शिवसेनेकडून आग्रह धरला होता . त्यामुळे उपसभापती पद महीनाभर रिकामेच राहीले आहे.

या रिकाम्या जागेवर शिवसेनेचाच उपसभापती होईल अशी अपेक्षा होती. परंतु शिवसेनेमध्ये समेट न झाल्याने मुुरुमकर व माळी यांच्याासह आवाडे गटाचे अजिम मुजावर यांनी ही अर्ज दाखल केल्यानेेे उपसभापती निवडीमध्ये रंगत निर्माण झाली. अखेर गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये अजीम मुजावर यांनाा अकरा तर पिंदू मुरूमकर यांना आठ तर अरुण माळी यांना दोन मतांवर समाधान मानावे लागले. तर एका सदस्याने मतदान न करता कोरा कागद टाकल्याने एक मत वाया गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -