Wednesday, January 14, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : लाचप्रकरणी आणखी एका कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर गुन्हा दाखल; कॉन्स्टेबल फरार...

कोल्हापूर : लाचप्रकरणी आणखी एका कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर गुन्हा दाखल; कॉन्स्टेबल फरार तर पोलीस पाटील जेरबंद

कोर्ट वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शहापूर (इचलकरंजी) पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई (वय 40, रा. यड्राव) व पोलीस पाटील जगदीश भूपाल संकपाळ (रा. यड्राव, ता. शिरोळ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कॉन्स्टेबल सिराज भाई पसार झाला असून, पोलीस पाटील संकपाळ याला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आलीय.

पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि पथकाने ही कारवाई केली. गेल्या एक महिन्यात कोल्हापूर पोलिस दलातील चार पोलीस तीन ट्रॅप मध्ये सापडले आहेत. आठवड्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील विजय कारंडे आणि किरण गावडे हे दोघे दहा लाखांची लाच घेताना रंगेहात सापडले होते. आता त्यापाठोपाठ शहापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल आसिफ सिराजभाई याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -