Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनMister Mummy : रितेश देशमुख प्रेग्नंट?, ‘मिस्टर मम्मी’चे पोस्टर रिलीज!

Mister Mummy : रितेश देशमुख प्रेग्नंट?, ‘मिस्टर मम्मी’चे पोस्टर रिलीज!

रितेश दशमुख आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडमधील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. ३ फेब्रुवारीला दोघांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली असून हे दोन कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेले नाहीत. पण, आता प्रतिक्षा संपली आहे. रितेश आणि जेनिलियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून रितेश आणि जेनिलिया दशकानंतर एकत्रपणे मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, (Web Series)

निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली असून पोस्टरही रिलीज झाले आहे. या पोस्टरवर रितेश आणि जेनिलिया प्रेग्नेंट असल्याचे दाखवले आहे. ‘मिस्टर मम्मी’चे (Mister Mummy) दिग्दर्शन शाद अलीचे असेल, तर भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमाज प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती करत आहेत. चित्रपटाच्या कथानकातून जर एखादा पुरुष प्रेग्नंट झाला तर? या प्रश्नाचा वेध विनोदीशैलीद्वारे घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -