Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगदिलासादायक! 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध, या संकेतस्थळावर जाऊन करा...

दिलासादायक! 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध, या संकेतस्थळावर जाऊन करा डाऊनलोड!

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव खूपच कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परीक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही वारंवार केली जात होती. या मागणीचा विचार करता प्रश्नपेढी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी व्हावे यासाठी यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ सुद्धा वाढवून देण्याचा निर्णय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आला आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

फेसबूक देत आहे विनातारण 2 ते 50 लाखापर्यंत कर्ज ! व्हिडिओ पहा

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ऑफलाइन पद्धतीने (Offline Exam) होणार असल्याचे शिक्षण महामंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परिक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान ऑफलाइन होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान ऑफलाइन होणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत दरम्यान घेण्यात येईल.

तर दहावीची प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान होणार आहे. कोरोनामुळे जे विद्यार्थी तोंडी किंवा लेखी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण अनिवार्य नसेल. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना पेपरसाठी जास्त वेळ सुद्धा देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -